PODCAST · news
"राज"कारण " Rajkaran
by Sakal Media
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही...https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra.It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionad
Episodes
-
RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं...
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहावरून मराठवाड्यात आलेल्या डॉ. रफिक झकेरिया यांनी औरंगाबादच्या विकासाला नवी दिशा दिली. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला. पुढे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या...
-
RAJ'KARAN PODCAST : थेट अंबानींच्या प्रकल्पाला भिडले... एन. डी. पाटलांनी रायगडच्या शेतकऱ्यांसाठी असा लढा उभा केला की रिलायन्सलाही माघार घ्यावी लागली!
एन. डी. पाटील म्हणजे सत्तेच्या खुर्चीपेक्षा शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लढवय्या नेता. रायगडमधील SEZ प्रकल्पासाठी हजारो एकर शेतजमीन जाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलनाची धुरा हाती घेतली. कायदेशीर अभ्यास,...
-
RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले!
विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भासाठी आयुष्यभर लढणारा ‘विदर्भाचा शेर’ म्हणजे जांबुवंतराव धोटे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक आणि रंजक किस्से घडले. 1964…
more -
RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण!
कोकणच्या राजकारणात एकेकाळी तरुण नेतृत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून श्रीधर नाईक यांची ओळख होती. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात संघटन उभं केलं आणि अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेने काँग्रेसला धक्का बसला आणि...
-
RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट राजकीय कहाणी
काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काय भूमिका बजावली? एप्रिल 1960 मध्ये मजदूर…
more -
RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अडकवून ठेवलं होतं
स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा, ऊस आणि वीज दराच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनं उभी केली. 1984 मध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत चंदीगडच्या राजभवनाला घातलेल्या...
-
RAJ'KARAN PODCAST : मंत्रिपद नाकारलेल्या विलासरावांनी अंतुलेंकडून लातूर जिल्हा मागितला; २५ वर्षांनी केली होती कृतज्ञतेची परतफेड
१९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले, पण विलासराव देशमुखांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. नाराज असलेल्या विलासरावांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या सल्ल्याने अंतुलेंचा लातूरमध्ये भव्य सत्कार आयोजित केला. याच कार्यक्रमात विलासरावांनी अंतुलेंकडे एक मागणी केली—लातूरला स्वतंत्र...
-
RAJ'KARAN PODCAST : 11 वेळा आमदार झालेले गणपतआबा 1999 मध्ये मुख्यमंत्री होता होता राहिले
११ वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीचं प्रतीक होते. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आयुष्यभर खांद्यावर घेत त्यांनी सांगोल्याचं तब्बल ५५ वर्ष प्रतिनिधित्व केलं. दोन वेळा मंत्री झाले, मात्र १९९९...
-
RAJ'KARAN PODCAST : शंकरराव चव्हाणांच्या एका शब्दाखातर पतंगरावांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; पुढे 5 वेळा संधी आली, पण हुकली!
पतंगराव कदम यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील अवघ्या ८६ मतांच्या पराभवाने झाली. १९८५ मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन करत विधानसभेत प्रवेश केला आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर...
-
RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देणार होते; पण एका निर्धारानं सगळं चित्रच बदललं...
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त अध्याय म्हणजे आणीबाणीला दिलेला पाठिंबा. इंदिरा गांधींच्या काँग्रेससोबतची जवळीक, १९७७ आणि १९७८ मधील निवडणुकीतील पराभव, शिवाजी पार्कवरील राजीनाम्याचा भावनिक प्रसंग आणि त्यानंतर शिवसेनेने घेतलेली हिंदुत्वाची वाटचाल, या...
-
RAJ'KARAN PODCAST : एक सल्ला... 39 परवानग्या... डी. वाय. पाटील यांचं आयुष्य बदलणारे दोन प्रसंग!
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या यशामागे फक्त त्यांची मेहनत नव्हती, तर दोन दिग्गज नेत्यांचा मोलाचा वाटा होता—राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील. राजारामबापूंनी त्यांना राजकारणात संधी दिली, तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली. राजकीय मतभेदांच्या काळातही डी. वाय. पाटील यांनी आपल्या...
-
RAJ'KARAN PODCAST : "निखिल आपलाच बच्चा आहे" म्हणणारे सुरेश जैन पलटले... खडसेंच्या मुलाचा बालेकिल्ल्यातच पराभव झाला…
२०१० च्या जळगाव विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण दिलं. राज्यात शिवसेना-भाजपची युती असतानाही सुरेशदादा जैन यांनी पडद्यामागून खेळलेल्या राजकीय डावामुळे निखिल खडसे यांचा अवघ्या १६ मतांनी पराभव झाला. या एका निकालानंतर एकनाथ खडसे आणि...
-
RAJ'KARAN PODCAST : दोन खेळ्या फसल्या... पण मराठी माणसानं भाजपला सत्तेपर्यंत नेऊन दाखवलं : शेवटची रिस्क मात्र महागात पडली
भाजपला केवळ दोन लोकसभा जागांवरून राष्ट्रीय सत्तेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रमोद महाजन हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. आधुनिक निवडणूक व्यवस्थापन, डेटा-आधारित प्रचार, मीडिया प्लॅनिंग आणि एनडीएची यशस्वी मोट बांधण्यामागील त्यांची भूमिका या भागात...
-
RAJ'KARAN PODCAST : ज्या बंगल्यात जन्म झाला... त्याच बंगल्यात तब्बल ५५ वर्षांनी मंत्री म्हणून गृहप्रवेश!
लोकनेते बाळासाहेब देसाईंपासून ते आजचे मंत्री शंभूराज देसाई आणि चौथ्या पिढीतील यशराज देसाई यांच्यापर्यंतच्या प्रेरणादायी राजकीय प्रवासाची ही गोष्ट. शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेतील भूमिका, कोयना भूकंपातील मदतकार्य, मुख्यमंत्रीपद हुकल्याची चर्चा, शिवसेनेतील...
-
RAJ'KARAN PODCAST : सोनिया गांधी नऊवारी नेसून उतरल्या होत्या शरद पवारांच्याविरोधात मैदानात; अनंतराव थोपटेंसाठी पणाला लावली होती ताकद!
१९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमधून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. या बंडानंतर सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात थेट शरद पवारांच्या राजकीय बालेकिल्ल्यात उतरून काँग्रेसची ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्या...
-
RAJ'KARAN PODCAST : शिवसेनेतील दोन मोठ्या भूकंपांमागे एकच छुपी गोम; 'मुंबई विरुद्ध घाटी' संघर्षाचा संपूर्ण इतिहास!
छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे फक्त सत्तेची महत्त्वाकांक्षा नव्हती. तर त्यामागे शिवसेनेतील अनेक वर्षांचा 'कोकण विरुद्ध घाट' हा अंतर्गत संघर्हीष दडला होता. १९९१, २०२२ आणि २०२६ या ३ ऐतिहासिक बंडांची तुलना करत हा पॉडकास्ट शिवसेनेतील प्रादेशिक सत्तासंघर्ष, मातोश्रीभोवतीचं नेतृत्व…
more -
RAJ'KARAN PODCAST : भास्कर जाधवांनी पहिल्यांदा शिवसेना मिलिंद नार्वेकरांना नडूनच सोडली होती... 22 वर्षांच्या वादाची फुल हिस्ट्री!
भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "नार्वेकर कोण लागून गेला?" या वक्तव्यामुळे २२ वर्षांपूर्वीचा संघर्ष पुन्हा समोर आला. २००४ मध्ये तिकीट कापल्याचा आरोप करत भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते. मात्र...
-
RAJ'KARAN PODCAST : भुजबळांचा 'गेम ओव्हर' झाला होता... पण विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारणच फिरलं!
1991 मध्ये शिवसेनेचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं आमदारपद जाणं निश्चित मानलं जात असतानाच विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण खेळच बदलून गेला. 16 आमदार...
-
RAJ'KARAN PODCAST : 50 मृत्यू, 2000 जणांना अटक अन् डॉक्टरकीचा काळाबाजार : इतिहासातील थरकाप उडवणारा रक्तरंजित घोटाळा!
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप उसळला असतानाच पुन्हा चर्चेत आलाय मध्य प्रदेशातील कुप्रसिद्ध ‘व्यापम’ घोटाळा. हजारो कोटींच्या या रॅकेटमध्ये मेडिकल प्रवेश, सरकारी नोकऱ्या, दलाल, अधिकारी, राजकारणी आणि संशयास्पद मृत्यूंची मालिका समोर आली होती. तब्बल ५० मृत्यू, २००० पेक्षा अधिक अटक आणि सीबीआय...
-
RAJ'KARAN PODCAST : वानखेडेनंतर शिवसैनिकांनी दिल्लीचं 'कोटला' स्टेडियम गाजवलं; ठाकरेंच्या एका विरोधानं वाजपेयींचं सरकार हादरलं होतं!
१९९९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध करत शिवसैनिकांनी थेट दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर घडलेल्या या धक्कादायक आंदोलनामुळे संपूर्ण देश हादरला होता. केंद्र सरकार, BCCI आणि सुरक्षा यंत्रणा अडचणीत आल्या होत्या. सामना...
-
RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेबांच्या एका निर्णयाने बदलला सत्तेचा खेळ : गोष्ट शिवसेनेतील सर्वात मोठ्या संघर्षाची
शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची ही Inside Story! बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर पक्षाचा वारसदार कोण होणार? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? 1990 च्या दशकातील शिवसेनेतील वाढत गेलेले मतभेद, रमेश किणी प्रकरणानंतर बदललेलं राजकीय समीकरण, 1997 आणि 2002 च्या मुंबई महापालिका निवडणुका, आणि अखेर...
-
RAJ'KARAN PODCAST : एका नौदल प्रमुखांमुळे पाडलं होतं वाजपेयींचं सरकार; दिल्ली हादरवणाऱ्या बंडाची Inside Story
१९९८-९९ मध्ये भारताच्या राजकारणात असा संघर्ष घडला, ज्यामुळे थेट केंद्र सरकारच कोसळलं. नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवत यांनी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निर्णयाला उघड विरोध केला आणि त्यानंतर त्यांची बडतर्फी झाली. या प्रकरणात जयललिता, सोनिया गांधी, सुब्रह्मण्यम स्वामी, शरद पवार…
more -
RAJ'KARAN PODCAST : नरसिंहरावांचं सरकार वाचवायला शिवसेना खासदार धावला : बाळासाहेबांनी राजकारणातूनच संपवलं
१९९३ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव सरकारविरोधात अविश्वास ठराव आला होता. सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता असताना शिवसेनेचे परभणीचे खासदार अशोक देशमुख यांनी निर्णायक भूमिका बजावल्याची चर्चा झाली. JMM लाचकांडात मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि देशभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांनी याला थेट...
-
RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक
१९९६ साली घडलेल्या रमेश किणी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. त्या वेळी शिवसेनेचे उदयोन्मुख नेते राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत ‘मातोश्री’पर्यंत मुद्दा नेला. वाढत्या दबावामुळे तपास CBI कडे सोपवण्यात आला. दीर्घ…
more -
RAJ'KARAN PODCAST : सिंगूर ते नंदीग्राम: ममता बॅनर्जींनी कसं संपलं बंगालमधलं डाव्यांचं राज्य?
पश्चिम बंगालमध्ये तब्बल 34 वर्षे डाव्या आघाडीची सत्ता अबाधित होती. शेतकरी धोरणांमुळे निर्माण झालेला भक्कम जनाधार हा त्यांच्या यशाचा मुख्य आधार होता. मात्र 2000 नंतर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहणाच्या निर्णयांनी परिस्थिती बदलली. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड या आंदोलनांनी राज्यात मोठा...
-
RAJ'KARAN PODCAST : सत्ता, विश्वासघात आणि खून : महाराष्ट्राला हादरवणारी दोन भावांच्या धगधगत्या संघर्षाची कथा
धाराशिवच्या राजकारणात पवन राजेनिंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील या चुलत भावांच्या नात्याने एक वेगळाच इतिहास घडवला. सहकार क्षेत्रातून सुरू झालेला त्यांचा एकत्र प्रवास पुढे सत्तेच्या संघर्षात बदलला. तेरणा साखर कारखाना, जिल्हा बँक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. 2004 च्या...
-
RAJ'KARAN PODCAST : खरात, एरंडे प्रकरणाआधी ‘जळगाव स्कँडलने’ हादरला होता महाराष्ट्र : 30 वर्षांनंतरही पीडित महिलांचा होतो थरकाप
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 1994 च्या जळगाव सेक्स स्कँडलची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रभावशाली टोळीने महिलांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याचा हा धक्कादायक प्रकार होता. मीरा बोरवणकर यांच्या तपासातून प्रकरण उघडकीस आले, पण अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच राहिले आहेत. KEYWORDS :...
-
RAJ'KARAN PODCAST : भारताने स्वतःच्याच विमानाचं हायजॅक घडवून आणलं अन् ऑपरेशन बांग्लादेश फत्ते झालं...
1971 मध्ये Research and Analysis Wingच्या रणनीतीतून भारतीय विमान हायजॅक प्रकरण घडले. यामुळे भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली, त्यांचा हवाई मार्ग बंद केला आणि बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोठा रणनीतिक व लष्करी फायदा मिळवला. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian...
-
RAJ'KARAN PODCAST : संघर्ष, सत्ता, ग्लॅमर आणि वाद... रुपाली चाकणकरांचा गृहिणीपासून महिला आयोग अध्यक्षपदापर्यंतचा सगळा प्रवास
रुपाली चाकणकर यांचा गृहिणीपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि वादांनी भरलेला आहे. महिलांसाठी काम करताना त्यांनी प्रभावी उपक्रम राबवले, मात्र विविध आरोप, टीका आणि राजकीय वादांमुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आणि राज्यातील वादग्रस्त नेत्या म्हणून ओळख...
-
RAJ'KARAN PODCAST : गुलमंडीत पहिली पाटी लागली अन् मराठवाड्यात सुरु झाला ठाकरेंच्या भगव्याचा प्रवास
1985 मध्ये Bal Thackeray यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मराठवाड्यात एन्ट्री झाली. औरंगाबाद (आताचे Chhatrapati Sambhajinagar) येथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष वाढला. महापालिका जिंकत शिवसेना मजबूत झाली. पुढे फुट, बंड आणि भाजपच्या उदयामुळे आता मराठवाड्यात सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. KEYWORDS…
more -
RAJ'KARAN PODCAST : ‘घरादाराचं वाट्टोळं करायचंय का?’ वडिलांचा विरोध डावलून 'विखे पाटलांची' राजकारणात उडी
आज अहिल्यानगरचे राजकारण राधाकृष्ण 'विखे पाटील' यांच्या शब्दाभोवती फिरते. सरकार कोणाचेही असो, त्यात विखे पाटील मंत्री असणारच हे मागच्या 20-25 वर्षांपासूनचे फिक्स गणित आहे. नगरमधील साखर कारखाने असो की दूध संघ असो की जिल्हा बँक असो सगळ्या गोष्टी विखे पाटील यांच्या हातात आहेत. उद्योग, आरोग्य...
-
RAJ'KARAN PODCAST : भाजपच्या निष्ठावंतांना जमलं नाही, ते 'पँथर'ने करून दाखवलं... पण कसं?
रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद मिळवले असून तिसऱ्यांदा राज्यसभेत प्रवेश केला आहे. पण साधं ग्रामपंचयातीचंही तिकीट फायदा असल्याशिवाय न देणारा भाजप आठवलेंना तिसऱ्यांदा राज्यसभा का देतोय? यामागील राजकारण काय आहे? तेच समजून घेऊ. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian...
-
RAJ'KARAN PODCAST : महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया : चूल आणि मूल वाक्याला पहिल्यांदा तडा दिला तो 'महाराष्ट्रानेच'!
इतिहासात फुले दांपत्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरूषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढेही चालू ठेवली. महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया महाराष्ट्रातच रचला गेला. 'चूल आणि मूल' हा वाक्प्रचार...
-
RAJ'KARAN PODCAST : भाजपच साम्राज्य मजबूत करणारा ‘माधव’ पॅटर्न : मुंडेंनी वाढवलेल्या झाडाची फळे फडणवीस चाखतायत!
'माधव पॅटर्नमुळे' महाराष्ट्रात भाजपचे सध्या सर्वार्थाने 'अच्छे दिन' सुरू आहेत. कोणतीही निवडणूक असली तरी त्यात भाजपचाच डंका दिसून येतो. 2014, 2019 अन् 2014 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पार जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा विक्रम केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री...
-
RAJ'KARAN PODCAST : एका विरोध झाला अन् मुन्ना महाडिक, बंटी पाटील मैत्रीचा कायमचा कंडका पडला! कोणालाही माहिती नसलेली स्टोरी
बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक... महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेले दोन पैलवान. दोघेही एकेकाळी जिवलग मित्र होते, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. पण शैक्षणिक काळापासून ते आणि राजकारणापर्यंत यांची मैत्री डोळे दीपावणारी होती. त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्यावर फेऱ्या...
-
RAJ'KARAN PODCAST : राजीव गांधींच्या एका वाक्यावर शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला...
केंद्रात काँग्रेसची ताकद वाढत होती. विरोधी पक्षात बसून राजकारण करण्यापेक्षा सत्तेत यावं असे राजीव गांधी यांचे मत होते. खासदार असताना शरद पवार यांचा राजीव गांधी यांच्यासोबत संवाद व्हायचा. त्यावेळी त्यांनी बोललेल्या एका वाक्यानंतर शरद पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. KEYWORDS :...
-
RAJ'KARAN PODCAST : कधी पक्षाविरोधात जाऊन, कधी कोंडून ठेवून तर कधी शरद पवारांचा विरोध डावलून अजितदादांनी नेते तयार केले...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय उंची सांगणारे वेगवेगळे लेख, बातम्या वाचनात येत आहेत. पण नेते घडवणारे 'विद्यापीठ' म्हणूनही अजितदादांची ओळख होती, हेही तितकेच खरे आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions,...
-
RAJ'KARAN PODCAST : रामराजे नाईक निंबाळकरांचा एक नकार अन् सुरु झाला एकमेकांचं अस्तित्व संपवणार संघर्ष...
फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. सुरुवातीला एकत्र काम करणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा वाद दुसऱ्या पिढीत पोचला आहे. दुसऱ्या पिढीत मात्र तो वाद वैयक्तिक पातळीवर येऊन पोचला आहे. KEYWORDS…
more -
RAJ'KARAN PODCAST : 'पायलट' नातवाने 'मुख्यमंत्री' आजोबांच्या वर्चस्वाचं विमान जमिनीवर आणलं...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विमानाचे कॉकपिट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपूर्ण राज्याने बघितली. सत्तेच्या वारशाच्या वादाने, विचारांच्या लढायांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा…
more -
RAJ'KARAN PODCAST : विलासरावांनी निलंगेकरांविरोधात पुकारलेलं बंड राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता...
शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख या दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांमधील हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील वाद नव्हता, तर जिल्ह्याची नाडी कोणाच्या हातात राहणार आणि राज्याच्या सिंहासनावर कोणाचे वर्चस्व असणार, याचा ऐतिहासिक लढा होता. एकेकाळी मार्गदर्शक असलेल्या निलंगेकरांच्या विरोधात विलासरावांनी...
-
RAJ'KARAN PODCAST : बलाढ्य काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला... बाळासाहेबांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेचा 'महापौर' बसवला!
मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. आधी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे असणारे चित्र आता शिवसेना विरुद्ध भाजप असे झाले आहे. विरोधक बदलले असले तरीही शिवसेना या लढाईत गेल्या 60 वर्षांपासून लढत आहे. पण शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका कधी जिंकली? पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर कसा…
more -
RAJ'KARAN PODCAST : कोल्हे - विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय... सहकारातून सुरू झालेले 'महायुद्ध'
सहकाराच्या मातीत पेरलेले राजकारण जेव्हा सत्तेच्या संघर्षात रूपांतरित होते, तेव्हा अहिल्यानगरच्या राजकारणात दोनच नावे गाजतात ते म्हणजे कोल्हे आणि विखे-पाटील! ही केवळ दोन घराण्यांची लढाई नाही, तर कोपरगाव आणि राहाता या दोन साम्राज्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi...
-
RAJ'KARAN PODCAST : किंगमेकर' विरुद्ध 'जायंट किलर'! गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधील वर्चस्वाच्या लढाईचा धगधगता इतिहास
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये तीन दशकांपूर्वी पडलेल्या वादाची ठिणगी आजही शमलेली नाही. प्रस्थापितांची गढी रोखण्यापासून ते थेट आव्हान देण्यापर्यंतचा हा थरार आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. एकाच पक्षात असूनही त्यांच्यातील कोल्ड वॉर संपलेले नाही. त्यांच्या भुतकाळातील संघर्षांचे मूळ...
-
RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं!
नारायण राणेंची राजकारणातील जुनी आणि सुरुवातीची ओळख सांगायची तर अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता अशी होती. मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचे नाव पुढे असायचे. हेच राणे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले,...
-
RAJ'KARAN PODCAST - मुंडेंनी ताकद दिली अन् मिटलेली भांडणं पुन्हा पेटली : व्याही बनले एकमेकांचे कट्टर दुश्मन
बीडच्या गेवराईतील पवार–पंडित घराणं. एकमेकांशी सख्ख्या नातेसंबंधात असलेले आणि स्वतःला घरंदाज म्हणवणारे हे लोक जेव्हा एकमेकांना मारायला उठतात, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावतात. नगरपालिकेच्या निवडणुकांनी गेवराईत पवार–पंडितांचं रस्त्यावरचं भांडण राज्यभर चर्चेचं बनलं. पण हे आजच पहिल्यांदाच झालंय का?…
more -
RAJ'KARAN PODCAST : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण
एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज...
-
RAJ'KARAN PODCAST : केशरकाकूंनी निर्माण केला दबदबा... क्षीरसागर कुटुंबाने 70 वर्षे गाजवलं बीडचं राजकारण
राज्यात काही मोठी राजकीय घराणी आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. त्यामध्ये बीडच्या क्षीरसागर घराण्याचाही महत्वाचा समावेश आहे. काँग्रेस नेत्या आणि बीडच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. या कुटुंबाची सात…
more -
RAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री?
राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे वय केवळ २१ वर्षेही पूर्ण झाले नव्हते. इस्लामपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या भावाऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले. मुंबईत जाताना ते फक्त एका बॅगेवर आले होते आणि चार महिने मुंबईत राहतील, असे ठरले होते. त्यानंतर येथील...
-
RAJ'KARAN PODCAST | अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर घरी गेलेला नेता पुन्हा आला थेट अर्थमंत्री झाला
संघाचे स्वयंसेवक ते मंत्री असा राजकीय प्रवास राहिलेल्या ज्येष्ठ भाजप नेते, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महादेवराव शिवणकर यांची राजकीय कारकीर्द संघर्ष, समर्पण आणि दूरदृष्टीने गाजलेली अशीच राहिली आहे. शिवणकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे...
-
RAJ'KARAN PODCAST: एका दुधवाल्याने नगरच्या राजकारणात उडी घेतली — सरपंच, आमदार ते थेट मंत्री झाला!
राजकारणातील प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या एका साध्या दुधवाल्याचा, ज्याने नगरच्या राजकारणात प्रवेश करून सरपंच, आमदार आणि शेवटी मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. ऐका हा खास भाग RAJ'KARAN PODCAST मध्ये! KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions…
more
We're indexing this podcast's transcripts for the first time — this can take a minute or two. We'll show results as soon as they're ready.
No matches for "" in this podcast's transcripts.
No topics indexed yet for this podcast.
Loading reviews...
ABOUT THIS SHOW
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही...https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra.It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionad
HOSTED BY
Sakal Media
Loading similar podcasts...